जळगाव । अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ २६ मे रोजी घडली. प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरातील शिंदे नगरात प्रेम ठाकूर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रेम हा शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेम ठाकूर हा ठार झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post