जळगाव । महाबळ कॉलनीतील चंद्रलोक अपार्टमेंट शेजारी राहणारी महिला कामासाठी बाहेर गेलेली असताना घराच्या कपाटातून १० हजार रुपये चोरीला गेले आहेत. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. ही घरफोडी महिलेच्या विभक्त पतीनेच केल्याचे समोर आले आहे.
महाबळमध्ये रंजना धनराज भालेराव या त्यांच्या सात वर्षाच्या मुलासोबत राहतात. त्यांचे १० वर्षांपूर्वी धनराज भालेराव यांच्याशी लग्न झाले. त्यांचा पती शहरातील काही दवाखान्यांमध्ये पीआरओचे काम करतो; परंतु तो दुसऱ्या बाईसोबत राहत असल्याने रंजना भालेराव या विभक्त राहतात. गुरुवारी दुपारी १२ वाजता कामासाठी बाहेर गेल्या असताना स्थांचा मुलगा घरात एकटाच होता.
तेव्हा त्यांचा विभक्त राहत असलेला पती धनराज सुदाम भालेराव (रा. पिलखेडा, ता. जळगाव) घरात आला. त्याने रंजना यांनी घरभाडे, किराणा व मुलाच्या शिकवणीसाठी कपाटात ठेवलेले १० हजार रुपये लांबवले
Discussion about this post