जळगाव : जळगावमध्ये अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घेतला आहे. वाळू वाहनाच्या धडकेत अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. आता अशातच वाळूने भरलेल्या ट्रेकने क्रुझरला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चौघे जखमी झाले आहे. जळगाव शहरापासून नजीक असलेल्या बांभोरी गावाजवळ ही घटना घडली.
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे सुरु असून मंदिरात महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा करायचे नियोजन असल्याने आज शुक्रवारी ७ नागरिक ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जात होते.
मात्र, बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रालाने क्रुझरला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात तुषार जाधव वय – २५, रा. खोटे नगर, मूळ गाव धोबी वराड, विजय हिंमतराव चौधरी वय – ४२ रा.साई नगर, भूषण सुभाष खंबायत वय – ४५ रा.साईनगर यांचा अपघातात मृत्यू झाला असून ४ भाविक जखमी आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने पाळधी पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे.















Discussion about this post