जळगाव ।जळगाव- छत्रपती संभाजी नगर मार्गावरील फर्दापुर ते तोंडापूर दरम्यान ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्नात या ट्रकचा अपघात झाला.सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, ट्रकचा चालक सुखरूप आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर उलटल्यानं छत्रपती संभाजी नगर-जळगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव- छत्रपती संभाजी नगर मार्गावरील फर्दापुर ते तोंडापूर दरम्यान दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. समोर असलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबला, मात्र पावसामुळे रस्ता ओला असल्यानं ट्रक स्लीप झाला, ट्रक पलटी होऊन काही अंतर फरफटत गेला, व रस्त्यावर आडवा झाला.
त्यामुळे जळगाव – छत्रपती संभाजी नगर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने ग्रामस्थांनी, वाहन चालकानं रस्त्यातून ट्रक हटवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, अखेर जेसीबीच्या मदतीनं हा अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Discussion about this post