जळगाव | महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा झाली असून लवकरच महायुतीसह महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात आपआपल्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. नव्यांना संधी मिळणार की विद्यमान आमदार पुन्हा आपली दावेदारी ठोकणार याची उत्सुकता लागली आहे. ज्यांना खात्री आहे ते कामाला लागले असून आपल्या विरोधात कोण असेल याची चाचपणी करण्यात मग्न झालेले आहे.
जळगाव जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख जिल्हा आहे. या जिल्ह्यात 11 विधानसभेच्या जागा आहेत. यातील विधानसभेच्या जागेवर महायुती मधील तिघाही पक्षांचे उमेदवार जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीला विराजमान आहेत.
आचारसंहिता लागल्यानंतर युती असो की आघाडी कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी यापूर्वी झालेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपले काही उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते व कॅबिनेट दर्जाचे मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र इतर जागांवर कुणाला संधी मिळणार अन् कुणाचा पत्ता कट होणार हे पाहावे लागेल. सर्वांचे लक्ष तिकीट जाहीर करण्याकडे लागले आहे.
विद्यमान आमदारांची आपापल्या मतदारसंघात तयारी सुरू झाली असली तरी विरोधी पक्षाकडून कोणता उमेदवार आपल्या समोर उभा राहील किंवा आघाडीला कोण युतीमधील आव्हान देईल यासाठी चाचपणी सुरू आहे. यामधील किती माघार घेणार किती मैदानात उतरणार हे अजून नक्की नसले तरी यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये अनेकांची वर्णी लागणार आहे. आता वाट पाहायची आहे ती नाम निर्देशन भरण्याची व माघारीची. युती बाजी मारणार की आघाडी हे तर वीस नोव्हेंबरला ठरणार आहे, मात्र सर्वांनीच त्याआधीच कंबर कसलेली दिसून येत आहे.