जळगाव । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त श्रीमती गायकवाड यांनीही स्वागत केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमित शाहा यांचा जळगावचा दौरा ठरला असतांना अचानक याला स्थगिती आली. यानंतर आज ते जळगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सागर पार्क मैदानावर युवाशक्ती संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाहा हे तरूण कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
Discussion about this post