जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आलीय. अनंत उर्फ बंटी जोशी (वय ५०) असं माजी नगरसेवकाचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजताच समाजातील मान्यवर आणि मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली.
शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता जयनगर परिसरातील राहत्या घरी हा प्रकार घडला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बंटी जोशी हे जळगाव महानगरपालिकेतील अभ्यासू आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात जमले. यामध्ये माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, आयुष मणियार, पीयूष कोल्हे, पीयूष मणियार, सरिता माळी, कैलास आप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, जमील देशपांडे, प्रवीण कोल्हे आदी मान्यवरांचा समावेश होता.
Discussion about this post