Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जळगावच्या मेडिकल हबची पाहणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जळगावच्या मेडिकल हबची पाहणी
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव- संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आर्किटेक्चरल मॉडेलच्या माध्यमातून मेडिकल हबची सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी 5,615 चौ.मी. क्षेत्र असून त्यावर 41,622 चौ.मी. बांधकाम करण्यात आले आहे. रुग्णालयासाठी राखीव असलेल्या 5,890 चौ.मी. क्षेत्रावर देखील 41,622 चौ.मी. इतके बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच निवासस्थान व वसतीगृहांसाठी 1,14,345 चौ.मी. क्षेत्रात बांधकाम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मेडिकल हबमधील इमारतींची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. या वेळी दिसून आलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले.

या मेडिकल हबमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संशोधन केंद्र यासह आरोग्यसेवेचे सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीकोनातून आरोग्य क्षेत्रासाठी “गेम चेंजर” ठरेल.

जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळणार आहे. यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

तरुणांसाठी खुशखबर ! LIC मध्ये ८४१ पदांसाठी भरती जाहीर, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी एलआयसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

तरुणांसाठी खुशखबर ! LIC मध्ये ८४१ पदांसाठी भरती जाहीर, पात्रता जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page