जळगाव | जळगाव शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. ३५ वर्षीय तरुणावर तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केलं होता. या घटनेतील जखमीचा आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसूंबा) असं मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे कि, काल रात्री कुसूंबा येथील रहिवाशी अविनाश अहिरे त्यांचे मित्र सुभाष कुकडे यांच्यासोबत जळगाव शहरातील खोटेनगरजवळ कार एमएच. १९. ईए.०४५१ उभी करून बसले होते त्यावेळी जून्या वादातून अहिरे व कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली.
यावेळी एकाने अहिरे याच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केलं होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी अहिरे याचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post