जळगाव । भरधाव ट्रकने कट मारल्याने दुचाकीवरून फेकला गेलेला २० वर्षीय तरुण ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महामार्गावरील मानराज चौकात घडली. संजोग सुरेश सपकाळे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव आहे. संतप्त जमावाने चालक वक्लीनरला मारहाण करत ट्रकच्या काचा फाेडल्या. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठपाेलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्धगुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते
याबाबत असे की जळगाव तालुक्यातील गाढोदा येथील आनंद नवल सपकाळे याच्यावर आकाशवाणी चौकालगत असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचा जेवणाचा डबा नेण्यासाठी आणि रुग्णालयात थांबण्यासाठीच्या साहित्यासह वडील नवल बिसन सपकाळे (वय ४७) आणि चुलत भाऊ संजोग सुरेश सपकाळे (वय २०) हे दुचाकीने (क्र. एमएच १९- ईई ९८६६) गाढोदा दहिदुले- झुरखेडा- पथराड-पाळधी मार्गे जळगावला येण्यासाठी निघाले. गुजराल उड्डाण पुलावरून मानराजचाैकात आल्यानंतर चाैकातील गतिराेधकाजवळ त्यांनीदुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून भरधाव ट्रकने (क्र. एनएल ०२ ओ ९९३२) कट मारत धडक दिली.
याधडकेने दुचाकीसह नवल सपकाळे दुभाजकावर फेकलेगेले तर संजाेग ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानेत्याचा चेंदामेंदा झाला. धडक देऊन ट्रक शिवकाॅलनीकडेपसार झाला. चाैकातील विविध खाद्यपदार्थाच्या गाड्यांवरउभ्या असलेल्या अनेकांनी हा अपघात पाहिला आणित्यातील काही तरुणांनी ट्रकचा पाठलाग करूनशिवकाॅलनीच्या पुढे अडवत संतप्त जमावाने चालक वक्लीनरला मारहाण करत ट्रकच्या काचा फाेडल्या.अपघातानंतर जिल्हापेठ व रामानंदनगर पोलिसांनीघटनास्थळी पाेहाेचून संजाेगचा मृतदेह व जखमी नवल सपकाळे यांना जीएमसी रुग्णालयात हलवले. तर वाहतूकपोलिसांनी ट्रक व चालकाला ताब्यात घेऊन जिल्हापेठपाेलिस ठाण्यात जमा केले. रात्री पर्यंत ट्रकचालकाविरुद्धगुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. संजाेग आईसाेबतराहत हाेता. आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या संजाेगचा भाऊशुभम व वडील सुरेश सपकाळे हे सुरतला कामाला असूनताे आईसाेबत गाढाेदा येथे राहत हाेता.















Discussion about this post