जळगाव । जळगाव शहरातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव करणे ५ महिलांसह २ चिमुरड्यांना जबर धडक दिल्याची घटना मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत घडली. यात शोभा रमेश पाटील (वय ६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुन) या महिलेचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला जखमी झाल्या असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते .
याबाबत असं की, जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी 18 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील काही गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या. तर एक महिला रस्त्यावरुन जात होती.
रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार (एम.एच.०५ ए.एस०५७४) रस्त्याने भरधाव आली.कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना अपघातग्रस्त कार मध्येच टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
या अपघातातील कारचा चालक कार चालक पवन कैलास पाटील वय 25 रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण जळगाव हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. कारचा चालक रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे
Discussion about this post