Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

रुग्णालयात दाखल असल्याने घरी जाण्याची उत्सुकता; पण रस्त्यातच पिता-पुत्राला सोबत घडलं विपरीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 6, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
रुग्णालयात दाखल असल्याने घरी जाण्याची उत्सुकता; पण रस्त्यातच पिता-पुत्राला सोबत घडलं विपरीत
बातमी शेअर करा..!

जळगाव: जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ उड्डाणपूलावर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दुचाकीवर मागे बसलेले वडील हे अचानक खाली पडल्याने त्यांच्या अंगावरुन वाहन गेले. यात ते जागीच ठार झाले तर या अपघातात दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याने पिता-पुत्राला घरी परतण्याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार दोघेही दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच दोघांसोबत विपरीत घडलं. युसूफ शेख ईस्माईल खाटीक (७८, रा. पारोळा) असे मयत पित्याचे नाव असून त्यांचा मुलगा दुचाकीचालक अस्लम शेख युसूफ खाटीक (४४, रा. पारोळा) हा जखमी झाला आहे.

पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक आणि अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयातच दाखल होते. रुग्णालयातून शुक्रवारी त्यांना डिचार्ज मिळाला.

त्यानंतर अस्लम शेख युसुफ खाटीक त्यांचे वडील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्यासोबत दुपारी १ वाजता ते दुचाकीने घरी पारोळा येथे जाण्यासाठी निघाले. अस्लम शेख हे दुचाकी चालवत होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवर मागे बसलेले युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला. ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. तर दुचाकीस्वार अस्लम शेख हे जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनीही रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. डोळ्यादेखत पित्याचा करुण अंत पाहून अस्लम यांना मोठा मानसिक धक्का बसला. वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे नि:शब्द झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! विमान हवेत उडत असताना खिडकीच तुटली, पुढे काय झालं पहा व्हिडीओ..

Next Post

शिक्षणासाठी जळगावात आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिक्षणासाठी जळगावात आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल

शिक्षणासाठी जळगावात आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page