Thursday, August 7, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जल जीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम : १४९२ गावांमधील ६ लाख ८० हजार घरांना पोहचले नळाद्वारे स्वच्छ जल

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
August 31, 2023
in जळगाव जिल्हा
0
उद्या होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जळगाव शहरवासीयांसाठी महत्वाची बातमी !
बातमी शेअर करा..!

जळगाव : जल जीवन मिशनमध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्याने ६३.६१ टक्के गुण प्राप्त करत राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. तर देशात ६१ वा क्रमांक आला आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४९२ गावांमधील ६ लाख ८० घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‌ ‘ हर घर नल हे जल’ संकल्पनेतून साकार झालेल्या जलजीवन मिशनने जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेतला आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे १४०० योजना राबविल्या जात असून १ हजार २३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

जलजीवन मिशन सर्वेक्षण २०२३ मध्ये गुणांकन देतांना भौतिक प्रगती ज्यामध्ये घरांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा, पाणी गुणवत्ता तपासणी तसेच पाणीपुरवठा स्त्रोतांची एफटीके कीटद्वारे होणारी तपासणी तसेच प्रयोगशाळात होणारी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी‌‌ यासाठी गुण दिले जातात. तसेच संस्थात्मक रचना यामध्ये पूर्ण होणाऱ्या योजना गावांना हस्तांतरित करणे तसेच कौशल्य प्रशिक्षण या बाबींच्या आधारे ही गुणांकन होत असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जलजीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे. या अंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुध्द पेयजल पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.

जलजीवन सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत जलजीवन मिशनच्या अंतर्गत चमकदार कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांची रँकींग जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा हा राज्यातून पहिला तर देशातून ६१व्या क्रमांकावर आलेला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या यादीत १९९ जिल्ह्यांना नामांकीत करण्यात आले असून यात जळगावला हे स्थान मिळाले आहे.

जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्ह्याला अग्रस्थानावर आणण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पाणी पुरवठा खात्याचे अभियंते व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रोहिणी खडसेंची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Next Post

बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रकरण काय?

Next Post
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रकरण काय?

बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंदे ‘भारत ट्रेन’ची सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेत; असे आहेत प्रस्तावित वेळापत्रक?

नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले ; या स्थानकांवर असेल थांबा?

August 7, 2025
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

August 7, 2025
उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा

August 7, 2025
२५% टॅरिफचा फटका! ट्रम्पच्या निर्णयामुळे भारतात कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त होतील? जाणून घ्या

ट्रम्पचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आता ५०% कर भरावा लागणार

August 7, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page