जळगाव । भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात खूनप्रकरणी जिल्हा कारागृहात असलेला बंदिवान मोहसीन उर्फ राज बॉक्स अजगर खान (वय २५) याचा दोन दिवसापूर्वी कारागृहात खून झाला. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कारागृह रक्षक गणेश पाटील यांच्यावर निलंबनाची करण्यात आल्याची माहिती दिली. इतर अधिकऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
काल गुरुवारी मोहसीनच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदा करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, संशयित मारेकरी शेखर मोघे याला ताब्यात घेण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कारागृहातील एकाच बरेकमध्ये राहत असलेल्या सहआरोपी शेखर मोधे याने चाकूने मोहसीन खानचा खून केला. या घटनेची चौकशी करण्यासाठी डीआयजी डॉ. सुपेकर गुरुवारी विमानाने जळगावात दाखल झाले.
तेथून ते संध्याकाळी ५.४५ वाजता थेट कारागृहात दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड तास कारागृहातील घटना घडली त्या बॅरेकची पाहणी केली. त्यानंतर इतर बंदी व कर्मचारी यांना विचारपूस केली. कारागृहातील रेकॉर्डची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी असलेल्या गणेश पाटील या कारागृह रक्षकाचे निलंबन केले आहे. इतर वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी आपण स्वतः करणार असून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगितले. राज्यातील सर्वच कारागृहाच्या सुरक्षेचा विषय गंभीर बनला असल्याचे डॉ. सुपेकर म्हणाले.
मृत मोहसीनच्या भावाला पॅरोल मंजूर
खून झालेल्या मोहसीन खानचा भाऊ अरबाज उर्फ गोलू हा देखील रवींद्र खरात खून प्रकरणी कारागृहात आहे. अंत्यसंस्कारासाठी त्याच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. कोटनि डेथ पॅरोल मंजूर केल्याने अरबाजला दोन पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कारास पाठवले
Discussion about this post