नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजीनामा देत असल्याचे पत्र धनखड यांनी पाठवलं.
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी शक्य तितक्या लवकर निवडणुका घ्याव्या लागतील. संविधानाच्या कलम ६८ च्या कलम २ नुसार, उपराष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे, राजीनामा दिल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेली रिक्त जागा भरण्यासाठी शक्य तितक्या लवकर निवडणुका घेतल्या जातील.
७४ वर्षांच्या जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून कुणाची नियुक्ती होणार? राज्यसभेचे सभापती, अध्यक्ष म्हणून कोण काम पाहाणार? याबाबत केंद्रीय राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.
जगदीप धनखड यांचे वय ७४ असून मार्च २०२५ मध्ये हृदयाशी संबंधित आजाराने AIIMS मध्ये दाखल झाले होते. प्रकृतीच्या कारणामुळेच धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पण पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Discussion about this post