तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची आनंदाची बातमी आहे. इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात सध्या भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ITBP ने सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर केली आहे.
१२ वी पास उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना itbppolice.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे.
इंडो-तिबेटियन पोलिस दलातील या भरतीमध्ये सहाय्यक उपनिरिक्षक पदासाठी ७ पदे रिक्त आहेत. सहाय्यक उपनिरिक्षक (रेडिओग्राफर) पदासाठी ३ पदे रिक्त आहे. सहाय्यक उपनिरिक्षक (ओटी तंत्रज्ञ) पदासाठी १ जागा रिक्त आहे. फिजिओथेरेपिस्ट सहाय्यक उपनिरिक्षक पदासाठी १ जागा आहे. हेड कॉन्स्टेबलसाठी १ जागा रिक्त आहे.
या नोकरीसाठी पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.अर्ज करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये फी भरावी लागणार आहे.
या नोकरीसाठी पे स्केल ५ नुसार २९ हजार २०० ते ९१३०० रुपये पगार मिळणार आहे. पे स्केल ४ नुसार २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. पे स्केल ३ नुसार, २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.
ITBP मधील या नोकरीसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणी करुनच उमेदवारांची निवड केली जाईल. (ITBP Recruitment Process)















Discussion about this post