नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरोमध्ये ग्रॅज्युएट, अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ असणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही इसरोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल.
या पदासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदनवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग (B.E.Mechanical/Civil/Computer/IT/Electrical) डिप्लोमा पास केलेला असणे गरजेचे आहे. टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग (E&TC/Mechanical/Civil/Computer/IT/Electrical) डिप्लोमा पास असणे गरजेचे आहे.
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ बोर्डातून १०वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये IT (NTC/SCT) पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करु शकतात. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ९००० रुपये पगार, टेक्निशीयन अप्रेंटिस पदासाठी ८००० रुपये पगार तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ७७०० रुपये पगार देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०२४ आधी अर्ज करावेत.















Discussion about this post