नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम लिमिटेड म्हणजेच आयआरसीटीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयआरसीटीसीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयआरसीटीसीमध्ये कंसल्टंट पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही irctc.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
आयआरसीटीसीमध्ये या भरती मोहिमेत कंसल्टट पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही ६ जूनपूर्वी अर्ज करावेत. ही भरती मुंबई क्षेत्रासाठी होणार आहे. चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास आणि त्याचसोबत ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६४ वर्षे असावी. याचसोबत नियमांनुसार काही उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती मिळवावी.
आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही दोन प्रकारे करु शकतात.तुम्ही दिलेल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरा. त्यानंतर कागदपत्रांची पीडीएफ swati.chitnis@irctc.com वर पाठवू शकतात. याचसोबत तुम्ही तुमचा अर्ज आणि कागदपत्रे मॅनेजर (HRD), IRCTC लिमिटेड, पश्चित क्षेत्र कार्यालय, फोर्ब्स बिल्डिंग, ग्राउंड किंवा थर्ड फ्लोअर, चरणजीर राय मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post