आयआरसीटीसी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. IRCTC मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. एकूण ६ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे.
हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी ६ जागा रिक्त आहे. त्यात सामान्य प्रवर्गासाठी दोन जागा रिक्त आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी ३ जागा रिक्त आहे. तर एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ जागा रिक्त आहे.
आयआरसीटीसीच्या या नोकरीच्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्ष असणे गरजेचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हॉस्पिटॅलिटीमध्ये B.SC केलेले असावे. तसेच कलिनरी आर्ट्समध्ये एमबीए किंवा बीबीए केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता आणि अनेक भत्तेदेखील दिले जातील.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूसाठी जाताना तुम्हाला कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे. या नोकरीच्या मुलाखतीसाठी तुम्हाला IRCTC, दक्षिण मध्ये क्षेत्रीय कार्यालय, ऑक्सफोर्ड प्लाझा, सरोजनी देव रोड, सिकंदराबाद येथे उपस्थित राहायचे आहे.
Discussion about this post