नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी अपात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ मार्चपासून सुरु झाली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी www.ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील ही भरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असायला हवे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१-३५ असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरायचे आहे.
Discussion about this post