इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी पदभरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही होणार असून या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही ITI पास असाल अन् नोकरी शोधताय तर या नोकरीसाठी लगेचच अर्ज करा.
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी तुम्हाला iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही ३ मे पासून या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Indian Oil Recruitment) इंडियन ऑइलमध्ये १७७० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही २ जूनपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात येईल.
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे असावीत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
तुम्हाला सर्वप्रथम iocl.com या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Apprentice Recruitment 2025 सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा.
यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
Discussion about this post