इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने तरुणांसाठी अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, १७७० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पदवीधर आणि ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. अर्ज करण्यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट द्यावी. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
आवश्यक पात्रता :
१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे आहे.
२. उमेदवारांचे वय ३१ मे २०२५ च्या आधारावर मोजले जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
३. प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळे पात्रता निकष आहेत. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि सूचना वाचू शकता. काही व्यवसायांसाठी तुमच्याकडे अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. काहींसाठी, बॅचलर पदवी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही व्यवसायांमध्ये तुम्हाला कौशल्य प्रमाणपत्र मागितले जाते.
४. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.
निवडलेल्या उमेदवारांच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिने असेल. कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तात्पुरती तारीख ९ जून २०२५ आहे. कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आयोजित करण्याची तात्पुरती तारीख १६ जून २०२५ ते २४ जून २०२५ आहे.
भरतीसाठी अशा प्रकारे अर्ज करा-
१. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट द्यावी लागेल.
२. यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करावे लागेल.
३. यानंतर तुम्हाला भरती लिंकवर क्लिक करावे लागेल.
४. आता Click here for New Registration वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
Discussion about this post