जळगाव | केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या १२ संधी उपलब्ध झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन तसेच रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सध्या भारत पेट्रोलियम, डाबर इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध असून दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव (दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९०) येथे संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.















Discussion about this post