बारामती । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगांच्या तपासणी निवडणूक अधिकाऱ्याकडून केल्या जात असून याच दरम्यान आज बारामतीमध्ये शरद पवार पोहचले होते. हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
लोकसभेला मिळालेल्या यशानंतर आता शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचारासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले, खासकरुन साथ सोडणाऱ्या मंत्र्यांविरोधात त्यांनी रणशिंग फुंकले. बारामतीमध्येही त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
अजित पवार यांच्याविरोधात नातू युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलेय. आज आणि उद्या शरद पवार बारामतीमध्ये प्रचार करणार आहेत. पुतण्याविरोधात शरद पवार यांनी ताकद पणाला लावली आहे. दरम्यान शरद पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली. शरद पवार आपल्या होमग्राऊंडवर युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये आले आहेत. शरद पवार हेलिपॅडवर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी कपडे, पाणी बॉटल, वर्तमानपत्र आणी महत्त्वाची कागदपत्रे बॅगेत होती.















Discussion about this post