नवी दिल्ली । ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा करण्यात येईल. पण त्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळू शकते. ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मार्च महिन्यामध्ये दोन टक्के डीए (महागाई भत्ता) वाढवण्यात आला होता. त्यामुळे महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढला. आता यामध्ये आणखी तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातमोठी वाढ होऊ शकते.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकार डीए वाढीची घोषणा करू शकते.
महागाई लक्षात घेऊन सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. एक जानेवारी आणि १ जुलै या तारखेपासून महागाई भत्ता लागू होतो. मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 1 जानेवारीपासून लागू मानला गेला आहे. आता होणारी घोषणा 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या पेन्शनवर लागू होते.
Discussion about this post