मुंबई : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना संगमनेर न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी २०२० मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती.
मात्र, जिल्हा न्यायालयाने इंदुरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदुरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला.
याप्रकरणी इंदुरीकर यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. या अर्जावर आज सुनावणी करण्यासाठी विनंती केली होती
न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत इंदुरीकर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, इंदुरीकर यांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
Discussion about this post