तुम्हीही रेल्वेत नोकरीच्या शोधात असाल तुमच्यासाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. पॅरा-मेडिकल पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेतून 1376 पदे ही भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.
ही पदे भरली जाणार
या भरती प्रक्रियेतून नर्सिंग अधीक्षक 713, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 126 पदे, फार्मासिस्ट 246 पदे, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 64 पदे, प्रयोगशाळा अधीक्षक 27 पदे, फील्ड वर्कर 19 पदे, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट 4 पदे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 7 पदे अशी विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा ही द्यावी लागणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांसाठी 250 रूपये फीस ही असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित अगोदर वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.















Discussion about this post