इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. २१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ५१ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्ही careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी अवघे ५-६ दिवस उरले आहेत. (Indian Post Payment Bank Recruitment)
बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सर्व्हिसमध्ये ही भरती करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे जर नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. तुम्हाला या नोकरीसाठी ३०,००० रुपये मासिक वेतनदेखील मिळणार आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती
सध्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्येही विजिटिंग कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक विजिटसाठी ७००० रुपये मानधन मिळणार आहे. या नोकरीसाठीही अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.
Discussion about this post