भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार असून सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्किल्ड आर्टिसन पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत सर्व माहिती indiapost.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ३० ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीमध्ये पगारासोबत विविध भत्ते आणि सुविधा दिल्या जाणार आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये स्किल्ड आर्टिसन पदासाठी १० जागा रिक्त आहेत. यापैकी एम.वी मॅकेनिकसाठी ४ पदे आहेत. एम.वी इलेक्ट्रीशियन पदासाठी १ जागा रिक्त आहे. टायरमॅन, लोहार या पदासाठी प्रत्येकी १-१ जागा रिक्त आहेत.
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० ते ६३२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून ८ वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये सर्टिफिकेट आणि १ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. एम. वी मॅकेनिकल ट्रेडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. याचसोबत ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.















Discussion about this post