सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून भारतीय डाक विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. २०२६ मधील भरतीची घोषणा करण्यात आली आहे. फक्त १०वी पास तरणांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही चांगली संधी आहे.
पोस्ट ऑफिसमधील या भरती मोहिमेअंतर्गत २३ डाक सर्किलमध्ये भरती होणार आहे. एकूण २८,७४० पदांसाठी ही भरती होणार आहे. ही वर्षभरातील सर्वात मोठी भरती असणार आहे.
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी
डाक विभागातील ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड १०वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी पर्यंत आहे.
या भरती मोहिमेत ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्ट, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी फक्त १०वी पास असायला हवे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
पगार
डाक विभागातील या नोकरीसाठी पगार पदानुसार वेगवेगळा असणार आहे. जीडीएस पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपये पगार मिळणार आहे. शाखा पोस्ट मास्टर पदासाठी १२,००० ते २९,३८० रुपये पगार मिळणार आहे. हा पगार सरकारी नियमानुसार वाढवला जाईल.















Discussion about this post