तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. विशेष 50- 100 जागा रिक्त नसून तब्बल 21000 हून अधिक जागा रिक्त आहेत. ही नोकरी तुम्ही कोणत्याही परीक्षेशिवाय आणि मुलाखतीशिवाय नोकरी मिळवू शकता. परंतु लक्षात ठेवा की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.
इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 21413 पदांसाठी नोकर भरतीसाठी जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही तर या पदांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती दहावी पाससाठी आहे. त्याची संपूर्ण माहिती indiapostgdsonline.gov.in वर तपासता येईल. तसेच येथून ऑनलाइन अर्ज देखील करता येईल.
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि ताबडतोब अर्ज करा. अर्ज शुल्काचा विचार केला तर सामान्य, ओबीसी उमेदवारांसाठी ते 100 रुपये निश्चित केले आहे, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वयोमर्यादा किती आहे?
भारतीय पोस्टने जीडीएस भरतीसाठी वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे. याअंतर्गत अर्ज करण्यासाठी वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सूट मिळेल.
असे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट – indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
तुमची मूलभूत माहिती भरून नोंदणी करा.
दहावीची गुणपत्रिका, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
Discussion about this post