भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये भरती निघाली असून ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तब्बल 3154 जागा रिक्त आहे.
अशा परिस्थितीत, पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार पोस्ट विभागाच्या indiapostgdsonline.cept.gov.in या GDS अर्ज पोर्टलवर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता:
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वय श्रेणी : उमेदवाराचे वय 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
शुल्क : 100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023
अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक असतील
आधार कार्ड.
दहावीची गुणपत्रिका.
मूळ पत्ता पुरावा.
पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
जात प्रमाणपत्र
PWD प्रमाणपत्र (असल्यास)
Discussion about this post