तुम्हीही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
असिस्टंट ऑपरेटर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष १०वी पास आणि टेक्निकल क्षेत्रात कामाचा अनुभव असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी उमेदवार २७ जूनला होणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये भाग घेऊ शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला oil-india.com वर जाऊन अर्ज करावा लागेल. एकूण १४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही २७ जून किंवा त्याआधी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.
पात्रता
ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत मॅकेनिक, फिटर किंवा इंस्ट्रुमें मॅकेनिक ट्रेडमध्ये सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. तसेच कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.वॉटर इंजेक्शन स्टेशन, गॅस कंप्रेसर स्टेशन, तेल किंवा गॅस उत्पादन, पॅरामेडिकल इंडस्ट्री किंवा IOR/EOR सुविधांमध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.
या नोकरीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ऑइल इंडियामधील नोकरीसाठी उमेदवारांना २१,४५० रुपये पगार मिळणार आहे. हा पगार तुम्ही जेवढे दिवस काम करणार त्यावर आधारित आहे.या नोकरीसाठी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हायचे आहेत.















Discussion about this post