इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे.
इंडियन ऑइलमध्ये इंजिनियरिंग आणि नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स पदासाठी भरती करण्यात येणार आहे.यात मेकॅनिकल इंजिनियरिंग, सिविल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग पदासाठी भरती केली जाणार आहे. इंजिनियरिंग पदासाठी १२० जागा रिक्त आहे. नॉन इंजिनियरिंग पदासाठी १२० जागा रिक्त आहेत. एकूण २४० जागांसाठी भरती केली जाणार आहे.
डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्याताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजीमध्ये फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा. तसेच नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १०,५०० रुपये स्टायपेंड पगार मिळणार आहे. नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ११५०० रुपयांची स्टायपेंड मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय करण्यात येणार आहे.
Discussion about this post