सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन ऑइलमध्ये फायनान्स वर्कसाठी असिस्टंट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२५ आहे.
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
या नोकरीसाठी उमेदवारांना पगार त्यांच्या पदानुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत उमेदवारांना महागाई भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड CA/CMA इंटरमीडिएट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. याचसोबत ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्कनंतर केली जाणार आहे. याचसोबत पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
स्टेट बँकेत भरती
सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत एफएलसी काउंसलर आणि एफएलसी डायरेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.















Discussion about this post