तुम्हीही भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय नौसेनेत मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. SSR Medical-02/2027 बॅचसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल. अर्जप्रक्रिया सुरु झाल्यावर तुम्ही www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
भारतीय नौदलातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ मार्च २०२६ रोजी सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला असावा. या नोकरीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान त्यांना १४,६०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. यानंतर लेवल ३ नुसार डिफेन्स पे मॅट्रिकनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी स्ट्रीममध्ये पास असणे गरजेचे आहे.या नोकरीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.
सिलेक्शन प्रोसेस
या नोकरीसाठी सर्वात आधी इंडियन नेव्ही एंट्रस टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी १ तासाचा वेळ दिला जाईल. यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमची पुन्हा परीक्षा होणार आहे. यामध्ये इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.
यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.
याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.














Discussion about this post