भारतीय नौदलात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी असून नौदलाने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३ आहे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
एक्सिक्युटीव्ह ब्रँच-
SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – ४०
एअर ट्रॅफिक कंट्रोलर – ८
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – १८
पायलट – २०
लॉजिस्टिक्स – २०
एज्युकेशन ब्रँच
एज्युकेशन – १८
टेक्निकल ब्रँच-
इंजिनिरिंग ब्रांच (जनरल सर्विस) – ३०
इलेक्ट्रिकल ब्रांच (जनरल सर्विस) – ५०
नेव्हल कन्स्ट्रक्टर – २०
शैक्षणिक पात्रता –
एक्सिक्युटीव्ह ब्रँच : ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी/ ६० टक्केगुणांसह MBA/ B.Sc/ B.Com + फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट विषयात डिप्लोमा/ ६० टक्केगुणांसह MCA/ M.Sc (IT).
एज्युकेशन ब्रँच: ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech.
टेक्निकल ब्रँच : ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
Discussion about this post