सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहर करण्यात आली आहे.इंडियन कोस्ट गार्ड रिजन इस्टमध्ये इंजिन ड्रायव्हर, फायरमॅन, एमटीएस, एमटी फिटर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
इंडियन कोस्ट कार्डमधील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. indiancoastguard.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत इंडियन कोस्ट गार्डमध्ये ही भरती केली जाणार आहे. इंजिन ड्रायव्हर ते मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वीची परीक्षा दिलेली असावी. याचसोबत डिप्लोमा/अप्रेंटिस / आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग चेन्नई, विशाखापट्टणम या ठिकाणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.(