सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांना ८ एप्रिल २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्जाची प्रिंट १३ मे २०२६ पर्यंत काढता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
इंडियन बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या शाखांमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या भरतीसाठी २२ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी प्रथम अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘New Registration’ पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून लॉग इन करावे. पुढे फोटो आणि सही अपलोड करून अर्ज सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
निवड प्रक्रिया आणि शुल्क
या भरतीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्यास ऑनलाइन परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
सरकारी बँकेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे.















Discussion about this post