बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. इंडियन बँकेत तब्बल १५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indianbank.in ला भेट देऊन ७ ऑगस्ट २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहे.
इंडियन बँकेत अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आवश्यक पात्रता
इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. १ एप्रिल २०२१ नंतर ग्रॅज्युएशन केले असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ मध्ये असावी. राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
निवडप्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासाठी एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेमध्ये पास झाल्यावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना त्या प्रदेशातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Discussion about this post