तुमचेही आर्मीमध्ये काम करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या भारतीय सैन्यात भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. भारतीय सैन्यात जज अॅडवोकेट जनरल शाखाअंतर्गत भरती केली जाणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून लॉ ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
इंडियन आर्मीतील या पदासाठी लॉ ग्रॅज्युएट असण्यासोबतच उमेदवारांनी अविवाहित असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. या भरती मोहिमेत एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही भारतीय सैन्यात अधिकारी बनायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता काय?
भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केलेले असावे. याचसोबत CLAT चा स्कोर असणे आवश्यक आहे. याचसोबत उमेदवारांचे बार काउंसिल ऑफ इंडिया किंवा राज्याच्या बार काउंसिलमध्ये वकील म्हणून रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. इंडियन आर्मीमधील या नोकरीसाठी २१ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
तुम्हाला किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी प्रशिक्षणाच्या कालावधीत ५६,१०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. त्यानंतर निवड झाल्यावर ५६,००० रुपये ते २,१८,२०० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post