भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जेएजी म्हणजेच जज एडवोकेट जनरल एन्ट्री स्कीम, या योजनेच्या माध्यमातून २०२५ सालासाठी ही भरती सुरु आहे. या एन्ट्री स्कीम मधून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सैन्यातील शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी म्हणून केली जाईल.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १५ जुलै २०२४ पासून सुरू होईल. १३ ऑगस्ट २०२४ ही अर्ज भरण्यासाठी ची शेवटची तारीख असेल.
या एन्ट्री स्कीम मधून महिला आणि पुरुष हे दोघेही अर्ज करू शकतात. कायद्याचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना भारतीय लष्करासोबत काम करायचे असल्यास जे ए जी एन्ट्री स्कीम ही एक सुवर्णसंधी आहे
आवश्यक पात्रता :
कायद्याचे पदवीधर असणे आवश्यक.
विशेषत: एलएलबी पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य
उमेदवारांनी किमान 55% गुणांसह तीन वर्षांचा किंवा पाच वर्षांचा LLB अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक
CLAT PG २०२४ उत्तीर्ण होणे आवश्यक
वयाची अट :
अर्जदाराचे वय २१ वर्षे ते २७ वर्षे असणे आवश्यक
या एन्ट्री स्कीम मध्ये कोणतेही आरक्षण लागू होणार नाही.
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या रँक नुसार दर महिना वेतन दिले जाईल.
लेफ्टनंट पदावरील अधिकारी – ५६,१००/- ते १,७७,५००/- दर महिना
मेजर जनरल पदावरील अधिकारी – १,४४,२००/- ते २,१८,२००/- दर महिना
लेफ्टनंट ते ब्रिगेडियर अधिकारी – १५,५००/- (मूळ वेतनाव्यतिरिक्त मासिक लष्करी सेवा वेतन)
प्रशिक्षण कालावधी – ५६,१००/- दर महिना
Discussion about this post