जर तुम्हाला इंडियन आर्मीत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन आर्मीत १४२व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
इंडियन आर्मीत एकूण ३० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.
इंडियन आर्मीत सिविल इंजिनियरिंग पदासाठी ८ जागा रिक्त आहे. कॉम्प्युटर सायन्स/ IT पदांसाठी ६ जागा रिक्त आहे. इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम / दूरसंचार पदासाठी ६ जागा रिक्त आहे. मेकॅनिकल / एयरो / इंडस्ट्रीयल इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत.
इंडियन आर्मीततील या नोकरीसाठी २० ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००६ पर्यंत जन्मलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये B.E/B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत अंतिम वर्षातील उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
एवढा पगार मिळेल :
लेफ्टनंट लेव्हल पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. कॅप्टन लेव्हल पदासाठी ६१,३०० ते १,९३,९०० रुपये तर मेजर लेव्हल पदासाठी ६९४०० ते २,०७,२०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.
Discussion about this post