जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यांनी ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली आहे
भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान हादरलं आहे. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली.
भारतीय सैन्य दलाकडून हवाई हल्ल्याआधी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली होती. “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” आणि Ready to Strike, Trained to Win”, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. त्यानुसार काही वेळातच पहलगाम हल्ल्याचा हिशोब चुकता केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सैन्य दलाने केलेल्या या कारवाईचं आता सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
Discussion about this post