पुणे । सध्या राज्यात अवकाळीचे सावट असल्याने ढगाळ वातावरण असूनही उकाडा कायम आहे. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पिकपाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा आहे.अशातच मान्सून विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सन कधी येणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.
भारतात कधी दाखल होणार मान्सून?
यंदाच्या वर्षी मान्सून 8 जूनपर्यंत देशात दाखल होईल असं सांगण्यात आलं होतं. बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल कशी राहिल, यावर १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.
सध्या राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानातील बदल पाहता देशात आणि राज्यातही अपेक्षित तारखेआधीच मान्सून धडकल्यास आश्चर्य वाटू नये. हो, पण नुकताच झालेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस नसून तो अवकाळी पाऊस असल्याचीही नोंद घ्यावी.
गेल्या महिन्यातच हवामान खात्याने 2024 च्या मान्सून अपडेटवर आपला अंदाज जाहीर केला होता आणि या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. शेतकऱ्यांना यंदा पाऊस सर्वसामान्यापेक्षा चांगला होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून कधी दाखल होतो ते पाहावं लागणार आहे.















Discussion about this post