नवी दिल्ली । स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आज एनडीएकडून ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आलीय. यातच लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राहुल गांधी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री राजनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षांना फोन करून अध्यक्षांसाठी पाठिंबा मागितला होता, त्यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मत मांडलय.लोकसभा अध्यक्षासांठी इंडिया आघाडीचा पाठिंबा असेल पण एनडीए आणि पंतप्रधान मोदींनी आमची अट मान्य करावी, असं राहुल गांधी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
“आम्ही राजनाथ सिंह यांना सांगितलं की, आम्ही त्यांच्या अध्यक्ष (उमेदवार)ला पाठिंबा देऊ, पण परंपरा अशी आहे की उपाध्यक्षपद विरोधकांना दिले पाहिजं.” राजनाथ सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील देखील चर्चा झाल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या संभाषणाचा खुलासा देतांना राहुल गांधी म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांचा ‘अपमान’ केला जातोय.पंतप्रधान मोदी विरोधकांकडून सहकार्य मागत आहेत, पण आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय, असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक २६ जून म्हणजेच उद्या होणार आहे. तर २७ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. विरोधी पक्षाने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार घोषित केलाय. कनिष्ठ सभागृहाच्या सभापतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.















Discussion about this post