जळगाव । जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र रावेर लोकसभेचे अपक्ष उमेदवार यांनी रक्षा खडसे यांच्यावर आक्षेप नोंदवला होता; मात्र वेळेत पुरावे सादर करू न शकल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे रक्षा खडसे अपात्र होण्यापासून बचाव झाला आहे. मात्र आता अपक्ष उमेदवार या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे माध्यमाचे बोलताना सांगितले .
रावेर लोकसभा मतदार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी हरकत घेतली असून रक्षा खडसे यांना 137 कोटीच्या गौणखणीज भूखंडाचा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्याला मात्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत संजय कांडेलकर यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली.
त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे पत्र दिले. मात्र कांडेलकर यांना उशीर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही हरकत फेटाळली. याबाबत रक्षा खडसे यांची उमेदवारी स्थगित व्हावी यासाठी हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती संजय कांडेलकर यांनी माध्यमांना दिली आहे















Discussion about this post