Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; पालकमंत्र्यांनी याबाबत दिली माहिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; पालकमंत्र्यांनी याबाबत दिली माहिती?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला.

शासनाकडून नारीशक्तीचा सन्मान

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या संदेशात म्हणाले, नारीशक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेतून प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 34 हजार बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. पात्र बहिणींच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस जोडणी आहे, अशा महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याच बरोबर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो युवतींचे फक्त पैशामुळे उच्च शिक्षण थांबणार नाही याची पुरेपुर काळजी शासनाने घेतली आहे.  युवक, युवतीचे पुढचं भवितव्य घडविण्यासाठी  कौशल्य व आर्थिक ताकत निर्माण व्हावी म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. यासाठी जळगाव जिल्हयात आतापर्यंत विविध आस्थापना, कंपन्याकडून 4630 पदे अधिसुचित झाली आहेत. उमेद‌वारांकडून ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशाची कार्यवाही सुरु आहे.

ज्येष्ठ नागरिकांची काळजी

शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असून  यासाठी ज्यांना 60 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना  31  ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबरोबर शासनाने जेष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत जिल्हयात आतापर्यंत 17485 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 65 वर्ष, पूर्ण झाली आहेत. अशा जेष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

आरोग्य व्यवस्था बळकटीकरण

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे बाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठी कामं झाली आहेत. त्यात आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे, शेतकरी, शेतमजूर, गोर-गरीब जनतेच्या आरोग्याला संजीवनी देणाऱ्या जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला गेल्या दोन वर्षात 40 कोटी पेक्षा अधिक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसाठी दोन वर्षात 47 कोटी पेक्षा अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून दिल्यामुळे हे रुग्णालयं अद्यावत झाली आहेत.

पीक विम्याच्या पैशाचा हातभार

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्र शासनाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सन 23-24 या खरिप हंगामात स्थानिक आपत्तीमुळे 2 लाख 49 हजार 488 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याच्या भरपाई पोटी 132 कोटी 74 लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तर उत्पन्नावर आधारित 3 लाख 87 हजार 973 शेतकऱ्यांना 523 कोटी 28 लाख मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची महिती पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात दिली.

जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केल्याचे सांगून महसूल प्रशासन हा शासनाचा, प्रशासनाचा कणा आहे. सर्व सामान्यांची छोटी छोटी कामं साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी अडलेली असतात. याची जाणीव ठेवून जिल्हा महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या पंधरवाड्यात महसूल पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यात प्रत्येक दिवशी एक विषयासाठी विशेष शिबीर घेवून लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

ई – चावडी प्रकल्पात विभागात जिल्हा प्रथम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याने सर्व गावांची 100% मागणी ई चावडी प्रणाली मध्ये नोंदणी केली त्यामुळे ई -चावडी अंमलबजावणी मध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आला, शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. पोलीस प्रशासनाच्या बळकटी करणासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून कायदा व सुव्यस्था अधिक मजबूत होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा गौरव वाढवित राहण्याची ग्वाही देऊन स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

5 वर्षांत मेडिकलच्या 75 हजार जागा वाढणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Next Post

बाबो..! निवृत्त ग्रामसेवकाला लावला लाखो रुपयांचा चुना, अशी झाली फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

बाबो..! निवृत्त ग्रामसेवकाला लावला लाखो रुपयांचा चुना, अशी झाली फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page