मुंबई । राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली होती. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे.
आता केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.
Discussion about this post