तुमचेही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीचे स्वप्न असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
प्राप्तिकर विभागाअंतर्गत वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी incometaxindian.gov.in वर जाऊन अर्ज शकतात. आयकर विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे.
आयकर विभागात ७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रिटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
आयकर विभागाने या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४७,६०० ते १५११०० रुपये पगार मिळणार आहे. पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४४९०० ते १४२४००० रुपये पेमेंट मिळणार आहे. तर कोर्ट मास्टर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये मानधन मिळणार आहे.
या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेला अर्ज व्यवस्थित भरावा. त्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे. ( Recruitment)